सन्मान मताचा
सन्मान मताचा
राजकारण तापत आहे
चिखलफेकीला ऊत आलाय,
प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यास
जो तो राजकारणी आता सज्ज झालाय
खुशाल करावे राजकारण
हा तर लोकशाहीचाच भाग आहे,
पण कुचेष्टा करू नका या लोकशाहीची
कारण या लोकशाहीसाठी कित्येकांनी केला त्याग आहे
लोकशाहीचा चौथा स्तंभ
निर्भीड पत्रकारिता आहे,
तीही विकली जाऊ लागलीय
हा तर लोकशाहीचा सर्वोच्च अपमान आहे
लोकशाही टिकली तर स्वातंत्र्य टिकेल
स्वातंत्र्य टिकले तर स्वाभिमान टिकेल,
अजूनही जनता जर आपले मत विकत असेल
तर एक दिवस भ्रष्ट राजकारणी या देशाला नक्कीच विकेल.
