संकट
संकट
देते मी हुलकावणी प्रत्येक संकटास
खळखळून हसणं हेच रहस्य माझं
कोणत ही संकट कुठवर टिकेल
एकतर ते नाहीतर माझ्या पापण्या मिटेल
पण हो माझ्या पापण्या मिटण्या आधी
मी कधीच माघार घेणार नाही
संकटांना समोर झुकण माझ्या रक्तात नाही
असेल वेळ आता जरी माझी नाजूक
पण मी भाऊक होणार नाही
संकटांना पायदळी तुडवल्या खेरीज
पुढे पाऊल टाकणार नाही...
दिसते-भासते तशी मी बिलकुल नाही
राहणीमान ही माझं याला अपवाद नाही ..
वसा छत्रपतींचा,आऊ साहेबांचा
जो नडला त्याचा कार्यक्रम मात्र ठरला
काळवेळ पाहुनी हा खेळ आयुष्याचा चालला...
संकटांना छेदण्याचा छंद माझा वेगळा
भंग स्वप्न पुर्ण करण्याचा वेध
अन् वेग माझा आगळा
जेव्हा होईल सर्व मार्गस्त
तो असेल पूर्णत्वाचा सोहळा
तो वर संकटांशी दोन हात करन
आणि त्यांना पुरून उरण हेच माझं धैय
देते मी हुलकावणी प्रत्येक संकटास
खळखळून हसणं हेच रहस्य माझं
