*"समुळ प्रेमधन"
*"समुळ प्रेमधन"
ती रात्र चांदण्यांची
ती बात स्वर्णमाधूरी
जणु कानी रूनझुन
रसाळ ओस धुंदकारी...
रेशमी डोर दोन जीवाची
चुपचाप बांधती नजारे
पापण्यात ठसे अमृत
दवबिंदू सम भिजणारे...
भरला सागर किनारा
उरली फक्त ओहोटी
संथ वाहतो गार वारा
कानी मधुरं गुज गोमटी...
दूर कुठे सनईची वाजते धून
अलगद भरते श्वासाने उर
निघतोय मनाचा काळा धूर
चेहऱ्यावर फुलतो नुरच नुर...
कातर वेळ गेली धूमसून
भान हरपले आतुर तनमन
श्वासा श्वासात भरली आस
जणू गवसले समुळ प्रेमधन..

