STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

स्मशान

स्मशान

1 min
83

मोठे स्मशान होते गावात बांधलेले

श्रीमंत तत्वज्ञानी राखेत सांडलेले


शत्रुत्व आज त्यांचे आगीत नष्ट झाले

शेतात दोन भाऊ आजन्म भांडलेले


पैशात पहिला मी व्यापार माणसांचा

भावात शून्य पैसे प्रेतास जाळलेले


दु:खात पाहिले मी आयुष्य भंगतांना

मातीत मूक झाले गर्वात मातलेले


सर्वांत लाडके जे साक्षात प्रेमगंगा

ते सर्व धूळ झाले लाडात वाढलेले


विश्वात शक्तिशाली श्रीमंत बादशाहा

सांगे स्मशान राजे येथेच गाळलेले


जाणून घे सखे तू हे मोल जीवनाचे

आगीत लोळ झाले गादीत लोळलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy