समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
चला हिरव्यागार निसर्गाला सोबती बनवू या
त्याच्या कुशीत शिरुन कोकणात जाऊ या
लाल मातीतली वाट निसर्गाचा थाट म्हणजे कोकण
धरती वरचा स्वर्ग म्हणजे कोकण
निळी खाडी माडाची झाडी सागराची गाज रुपेरी वाळूचा साज
ध्यानस्थ ऋशी सारखे आम्रवृक्ष
डोंगर दऱ्या तुन धो-धो कोसळणारे धबधबे
वळणाच्या घाटात ऊन पावसाचा लपंडावाचा खेळ
पक्ष्यांचा किलबिलाट मोराचा पिसारा
टवटवीत पान रंग बिरंगी फुले घनदाट जंगल खळखणारी नदी
रमणीय सकाळ, सोनेरी सूर्यास्त म्हणजे कोकण
सुंदर मनमोहक समुद्र किनारे
सुंदर मंदिर किल्ले वाडे कौलारु घर म्हणजे कोकण
फ्रेश नारळाची सोलकढी फणस, काजू, आंबा,
मासे कोकम, वालाचे बिरडे सुरमई, नारळ, जांभूळ, केवडा
कोकणाचा शिमगोत्सव आणि गणपती निसर्गाचा आनंद म्हणजेच समृद्ध कोकण
