श्रावणी व्रत वैकल्य
श्रावणी व्रत वैकल्य
1 min
193
व्रत वैकल्याचा ,
आला श्रावण मास।
शृगारली सृष्टी,
चैतन्याचा वास।
श्रावण महिना ,
करतो व्रत उपासना,
करू या जप ,तप आणि पूजा अर्चना
विधिवत ,
करू या आपण सर्व आराधना।
वाहू या लाहया आणि पाजू या दूध
नागोबा ला।
बांधू या हिंदोळा फांदी चा।
खेलू या फुगड्या
आला सण नाग पंचमी चा।
नारळी पौर्णिमा ,
पूजा सागराची।
संभाळ दौलत,
कोळी बांधवाची ।
कृष्ण जन्म झाला,
गोकुळाष्टमीला।
कस विसरेल,
कान्हा देवकीला।
सणा ची पर्वणी,
असे श्रावणात।
असे आनंदी आनंद,
असतो घरो घरात।
