निसर्ग माझा सोबती
निसर्ग माझा सोबती
1 min
444
चला हिरव्यागार निसर्गाला सोबती बनवू या।
त्याच्या कुशीत अलगद शिरून जाऊ या।
पाहिले मी हिरव्यागार डोंगरावरुन सौंदर्य।
हिरवा शालू नेसलेली सृष्टी, "डोंगरावरुन धो, धो कोसळणारे धबधबे,
पाहिले मी इंद्रधनुष्याचे सप्तरंगी रंग, घाटात ऊन पावसाचा खेळ ध्यानस्थ ऋषीसारखे आम्रवृक्ष।
पक्षी करती किलबिलाट कावळ्याची कावकाव कोकिळेचे कुहूकुहू हिरवा मोरपिसारा,
तृणात लपलेल फुलपाखरू, वृक्षाची टवट्वीत पाने, फुलांच्या चादरीने पांघरलेलं पठार,
नागमोड़ी वळणाचे रस्ते रंगबिरंगी फुले, दरवळलेला मातीचा सुगंध, नयनरम्य सूर्यास्त
सळसळणारे घनदाट जंगल, खळखळणारी नदी। चल लुटू या हिरवागार ठेवा निसर्गाच्या सान्निध्यात।
चला निसर्गाला सोबती बनवू या
