Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

समजून घेशील का....?

समजून घेशील का....?

1 min
1.2K


समजून घेशील का....?

जपतो तुला मी जीवापाड

तू पण मज गं जपशील का? ।

रागातही माझ्या दडले प्रेमच आहे

हे तू समजून घेशील का? ।।धृ।।

नसतोच माझा उद्देश सखे

तुझ्या मनाला दुखावण्याचे ।

शोक पाळत नाही मी

तुला सतत रडवण्याचे ।

जाणून माझ्या सद्भावनेला

अबोला तुझा हा सोडशील का? ।

रागातही माझ्या दडले प्रेमच आहे

हे तू समजून घेशील का? ।।१।।

प्रत्येक चुकीवर तुला मी बोलतो

कारण सुधारणा तुझ्यात व्हावी ।

इच्छा माझी आहे तुझे गं

शब्द असावे सर्वात प्रभावी ।

जोडुनी प्रितीचे नाते तू गं

प्रेमकाव्य आता लिहशील का? ।

रागातही माझ्या दडले प्रेमच आहे

हे तू समजून घेशील का? ।।२।।

डोळ्यात तुझ्या पाणी आले तर

जीव माझा गं तळमळतो ।

बोललो जरी तुला रागात मी

माझाच मी गं घुटमळतो ।

जन्मभराचे साथ मागतो

विसरुनी राग तू देशील का? ।

रागातही माझ्या दडले प्रेमच आहे

हे तू समजून घेशील का? ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance