STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

समजून घे मना: एक गझल

समजून घे मना: एक गझल

1 min
200

आघात तू विजांचे झेलून घे मना

प्रेमात वादळांशी खेळून घे मना

कंठात आज आला दाटून हुंदका

धरणास आसवांच्या बांधून घे मना


गेलीत माणसांना सोडून माणसे

एकांत वेदनांनी सजवून घे मना

जिंकूनही लढाई हरलोच मी कसा

झालेय राजकारण समजून घे मना


मारून कोण गेले शत्रू विना मला

मित्रांत एक शत्रू मोजून घे मना

प्रेमात काय माझा झाला सखी गुन्हा

शिक्षा उगाच झाली भोगून घे मना


कष्टात राबतांना उपवास का मला

झाले महाग जीवन जाणून घे मना

खेळून भावनांशी हसतात लोक का

ही रीत या जगाची रुजवून घे मना

झाला उठाव मोठा मौनात एकदा

आताच तू स्वत:ला जिंकून घे मना



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy