STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

समाधान

समाधान

1 min
227

आता नाही भीती मला,

अवघड परीक्षांची,

देऊन झाल्या बहुत,

झाली चाळणी आयुष्याची..!


आता नाही चिंता मला,

पाय घसरण्याची,

होतो घसरलो एकदा,

आहे माहिती उठण्याची..!


आता नाही खंत मला,

कमी मिळाल्याची,

सवय झाली आहे,

थोडक्यातच समाधानाची..!


आता नाही शंका मला,

अजून हरण्याची,

आधीच तयारी केलीय खुप,

आता वेळ जिंकण्याची..!


आता नाही इच्छा मला,

काही कमावयाची,

मिळाले भरभरून,

वेळ आली तेच वाटून थकायची..!


आता नाही गरज मला,

काही वेगळं सांगण्याची,

तुम्हीही समजला असाल,

भाषा ही मम् हृदयाची..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics