सलाम वीरांना
सलाम वीरांना
झाली पहाट आज सोनियाची,
१५ ऑगस्ट भारत स्वातंत्र्याची,
दिली आहुती आपुल्या प्राणाची,
वीर पुत्रांनी बलिदानाची ||१||
भारत स्वातंत्र्याचे स्वप्न डोळ्यात पाहिले,
प्राण उराशी घेऊनी ते देशासाठी लढले,
तमा नाही बाळगली आपुल्या जीवांची,
देशासाठी ते शत्रुवरी तुटुनी पडले ||२||
झेलल्या गोळ्या छातीवरी,
वीर अनेक धारातीर्थी पडले,
झाली गोद सुनी त्या मातांची,
जे कायम या देशासाठी लढले ||३||
झाली मुक्त भारत माता,
गगनी तिरंगा फडफडे आता,
गाऊ शुरवीरांची शौर्य गाथा,
भारत माते चरणी नमवु माथा ||४||
