पंढरीची वारी
पंढरीची वारी
1 min
407
गळा घालुनिया तुळशीच्या माळा |
लावुुुुनिया भाली केसरी गंध टिळा ||
हाती घेवून टाळ, चिपळ्या, |
चाले वारकरी पंढरीचा ||१
टाळ, मृदुंग, वीणा बोले |
हरिनामाच्या गजरात ||
नाचे वारकरी पंढरीचा |
विठुरायाच्या अंगणात ||२
बोले रामकृष्ण हरी |
नाचे पंढरीची वारी ||
टाळ, मृदुंगाच्या गजरात |
अवघी दुमदुमली पंढरी ||३