या सांजवेळी
या सांजवेळी
1 min
465
या सांजवेळी प्रिये तू यावे !
रंग गुलाबी भरुनी जावे !!
या सांजवेळी प्रिये तू यावे !
देव्हाऱ्यातील समई तू व्हावे !!
देवुनी प्रकाश उजळुनी निघावे !!!
या सांजवेळी प्रिये तू यावे !
तू धूप व्हावे, स्वतः जळूनी !!
सुंगधित तू मन करावे !!!
या सांजवेळी प्रिये तू यावे !
तू कळी होऊनी फुलावे !!
यौवन प्रितीत बहरुनी जावे !!!
कवी प्रविण खोलंबे.
