STORYMIRROR

amol sonawane

Abstract

4  

amol sonawane

Abstract

सल

सल

1 min
246

दिस सरत नाहीत

असे तोवर चालनं,

आशा मनात भाबडी,

अस सलतंय जिणं.


दोन पावलांची साथ,

एक आधाराला काठी.

गेली उडून पाखरे,

ज्यांच्या घास दिला ओठी.


उजाडतो रोज दिस,

बदलना काही जिणं.

वाटा त्याच उरल्यात,

गेलं फार अंधारून.


झाले आजीबाई आता,

आईपण ते सरलं.

माया कळणा कुणाला,

कोण आपलं उरलं.


पंढरीच्या विठुराया,

वारी नाही मायबापा.

नको देऊ वारंवार,

जन्म मरणाच्या खेपा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract