खोपा माणसाचा
खोपा माणसाचा
1 min
1.4K
कुणी टांगला टांगला,
असा खोपा हा पृथ्वीचा.
कसा ईनला ईनला,
धागा धागा माणसाचा.
काड्याकुड्या ह्या भेटल्या,
कशा येगळ्या येगळ्या.
न्यारी रीत माणसाची,
तऱ्हा येगळ्या येगळ्या.
घर एक माणसाचं,
जाती निराळ्या निराळ्या.
रक्त एका रं रंगाचं,
रीती येगळ्या येगळ्या.
दोन जीवांचा संसार,
कसा आभाळी टांगला.
दाणा भराया चोचीत,
बाप कष्टानं झिजला.
माय झुरते रे रोज,
चित्त तिचे पिलापाशी.
बाई घडवली अशी,
झुंज रोजची दुःखांशी.
गोतावळा एक केला,
कसा खोपा तो भरला.
सर्ग पायी आला माझ्या,
जन्म खोप्यामधी दिला.
