STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Romance

3  

.प्रमोद घाटोळ

Romance

सख्या रे

सख्या रे

1 min
291

ये जवळ तू माझ्या 

घे बाहूत मला सख्या रे

हृदयात बांध झुला

तिथे झुलेन मी सदा रे..१


प्रेमात धुंद होऊनी

फुलविण मी जीवन हे सारे

वादळ बनून ये लवकर

होऊन ये वारे..      २


वेणीत खोचला गुलाब मी

रंग अबोल जरी त्यातले

जा रात्रीच्या गर्भात

उमजेन भाव मग आतले..३


सांग कापू कसे हे अंतर

लपवीलास कुठे तो खंजर

सोसवेना भार यौवनाचा

झाले आठवणीत मी जर्जर..४


सोडून ये तू देश परका

ओठास घे चुंबून माझ्या

मिलनास अधीर पापण्याही

घेऊन ये बँण्ड बाजा..   ५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance