STORYMIRROR

Varsha Chopdar

Romance Others

3  

Varsha Chopdar

Romance Others

सख्या प्रीतझुला दे रे

सख्या प्रीतझुला दे रे

1 min
302

अक्षता पडल्या डोईवर

मन फुलपाखरू झाले रे

आकाशीचा चंद्र जमिनीवर 

सख्या प्रीतझुला दे रे 


दिवसामागून दिवस गेले 

जीवन लागले बहरू रे

स्वप्नात आहोत असे वाटले

सख्या प्रीतझुला दे रे 


वास्तव मात्र वेगळे होते 

जबाबदाऱ्या वाढल्या आहेत रे

मी ही तुला साथ देते

सख्या प्रीतझुला दे रे 


अनेक येतील अडचणी जरी

एकत्र येऊनी मात करू रे

आत्मविश्वास आणि सोबतच खरी

सख्या प्रीतझुला दे रे 


अभिलाषा धरू या ध्येयाची

पूर्ण कराया प्रोत्साहन देऊ रे

अशीच असावी सातजन्माची 

सख्या प्रीतझुला दे रे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance