STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

सखे टाक नवे पाऊल

सखे टाक नवे पाऊल

1 min
255

सखे टाक नवे पाऊल

तुझ्या नवविचाराचं

अंधश्रद्धेला गाडून

जग जिंकायचं....!!


विधवेला लावून कुंकू

कर तू परिवर्तन

जाचक ॠढी, परंपरा

दूर बदल तुझं वर्तन....!!


नवविचाराचा वारसा

भिनव सखे आचरणात

तुझ्यासारखीच तिही मग

घाण कशी तुझ्या डोक्यात....!!


नवविचाराचं चल वाण लुटू

त्याअगोदर गळाभेट घेऊ

गाढून टाक चालिरिती

सखे संस्काराचं,वाण देऊ....!!


दुबळ्या विचारांना फाटा देऊ

सुरूवात स्वत;:पासून करू

स्त्रीचं स्त्रीचे दुःख दूर करण्या

चल नवविचाराची गुढी उभारू...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational