STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

2  

Arun V Deshpande

Romance

सखे -साजणे

सखे -साजणे

1 min
13.4K


डोळ्यांची भाषा तुला 

सखे खूप छान येते 

शब्दाविना सांगते तू

मनासी बरोबर कळते ....!

येतेस साजणे भेटण्या 

सुरेखशा संध्याकाळी 

पाहून तुज सस्मितशी 

भान हरपे सोनेरी संध्याकाळी ..!

लौकिकात नसे भले तू 

अलौकिक ती सौंदर्यवती 

श्यामल रुपाची भुरळ पडली 

फिक्या भासती त्या रूपवती

नशीबवान आहे सखे मी 

दिलास तू होकार मला 

प्रतिसाद तव प्रीतीचा लाभता 

जगण्यातला अर्थ कळला ..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance