सजणा ये नं
सजणा ये नं
सजना आठवतेय मला
तो स्पर्श रांगडा तुझा
हवाहवासा वाटणारा
श्वास फुललेला माझा...
पडती कवडसे प्रेमाचे
त्यात तुझेच प्रतिबिंब दिसे
मनाच्या कुपीत अत्तराचा
सुगंध मस्त येत असे...
वेडे मन बावरे माझे
कुठंवर धीर धरू सांग नं
नयन तुझ्याच वाटेकडे
सदा फिरतसे कसं आहे नं...
विरह नको सजणा आता
नित्य मी तुझसाठी जळतसे
सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत मनी
तुझीच छबी ह्रदयी न्याहळतसे...
आताशा देह थकला रे सजणा
ये आता तू झडकरी मजसाठी
सुरेख, छान साजशृंगार करून
तयार होते मनापासून तुजसाठी...

