STORYMIRROR

siddheshwar patankar

Tragedy

2  

siddheshwar patankar

Tragedy

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला

1 min
377

माव्याची पुडी अशीच पडून राहिली

विजारीच्या खिशात तिला सापडली


पतिपरमेश्वर कर्माने मेला

भर ग्रीष्मात वर्षाव जो झाला


वर्षावासंगे आगडोंब उसळला

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला


रक्तावरुनी धडे गिरवले

अब्रूचे धिंडवडे काढले


लग्नाचे दागिने निघाले

सासरचे चौघडे वाजले


पोरें गुपचूप खेळ मोडिती

हातपाय धुवूनी स्तोत्रे म्हणती


गृहलक्ष्मी ती चाल करोनी

सर्वशक्ती प्राणाशी लढती


थेट भेटुनी विक्रेत्याला

नाव गाव अन ठिकाण विचारी


लागणारे सामान विचारी

माव्याचे प्रमाण विचारी


गोंधळ बघुनी तो गर्दी वादळी

नवरोबाची सर्दी वाढली


शिंका सुटल्या अशा भयंकर

बायको भासे त्सुनामी नंतर


विक्रेत्याने कडी काढली

बघता बघता धूम ठोकली


पतिरायाचे भान हरपले

माव्यापोटि मूत्र झिरपले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy