शुकशुकाट
शुकशुकाट
एक चिमुकला आला आणि धरले माझे पाय, म्हणे आजोबा आशीर्वाद द्या, मी म्हणालो देवा ह्याला म्हातारा व्हायचा आधीच घ्या.
हे ऐकताच तो दुखावला, आणि त्याचे आई -बाबा रागावले, आणि गेले निघून.
अनायासे विश्व थांबून गेले, शुकशुकाट झाला .
हं...माझ्या साठी हा शुकशुकाट काही नवीन नाहीए, मला ह्याची सवय झाली आहे.
म्हणायला दोन पोरं, सुना आणी नातवंड देखील आहेत,
3बीएचके फ्लॅट, दोन चकचकीत गाड्या आणि वर ड्राइवर सुद्धा आहे.
हे म्हणायला हो, येवढ असताना इथे मात्र शुकशुकाट.
ती सगळी तरुण मंडळी आणि आमी काय त्यात आऊट डेटेड.
रोज टीव्ही समोर बसायच आणि सातची घंटा झाली की मुलांची यायची वाट पहायची.
ही मात्र वाटच हं...
ते येणार...मला बळजबरीने स्माईल देणार आणि जाणार निघून बायको -मुलां सोबत .
पुन्हा तोच शुकशुकाट...
ज्यांना अंगा-खांद्यांवर खेळवले ते आज हिरावले, ज्यांना मोठ करायला डोळ्यांच्या वाती केल्या ते आज हरवले.
पाय थरथरता ए, डोळ्याने दिसत नाही, आधार मात्र ही काठी,
घर भरलेल आहे पण इथे मात्र शुकशुकाट.
नको हे जगणं... म्हणून सगळ्यांना हे समजू दे, म्हातार व्हायच्या आधीच घेऊन घे.
