जीवन - मृत्यु
जीवन - मृत्यु
जीवन आणि मृत्युचा हा प्रश्न आहे,
जगणार किती आणि मृत्यु कधी हे कोणास ठाऊक आहे.
मृत्युदारी उभ्या माणसाला पाहून सर्व पाप आठवतात,
जगताना मात्र सगळे पुण्या ला का विसरतात.
जन्माचा जिथे सोहळा असतो, मृत्युचा तिथे शोक असतो.
नाळ सुटल्यावर बंधन घडत, कवटी फुटल्यावर मात्र सगळं संपत.
असो आई,बाप,भाऊ-बहीण,बायको असो किंवा मैत्रीण,
किंवा असो मुलगा-मुलगी स्वरूपी आपले प्रतिबिंब.
सुटणार सगळीच इथे नाती, मृत्युला जाऊ जेव्हा भेटी.
गाडी , घोडा , पैसा, प्रॉपर्टी का जगतो आपण ह्यासाठी?
माहीत असून ही मित्रा की जाणार अखेर आपण तिरडी वाटी .
जीवन हे मिथ्या, मृत्यु मात्र सत्य आहे, तेव्हा मनसोक्त जगण्यातच तथ्य आहे.
13व्या दिवशी कावळा शिवणार, आणि सगळे आप आपला रास्ता धरणार.
रहाणार मात्र आठवणी आणि तुझ नाव, म्हणून म्हणते मित्रा चांगल्या कर्मांची पटी लाव.
जीवन -मृत्यु च्या ह्या खेळात मृत्यु कायम जिंकत आहे.
जीवन आणि मृत्युचा हा प्रश्न आहे, जगणार किती आणि मृत्यु कधी हे कोणास ठाऊक आहे.