श्री कृष्ण
श्री कृष्ण
श्रीकृष्णाला एका सामान्य व्यक्तीने प्रश्न केला 'कोण आहेस तू ? '
यावर श्रीकृष्णाने स्मितहास्य करत उत्तर दिले
कोण आहे मी :
या नियतीन अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी. जन्माला घातलेला एक व्यक्ती आहे मी
अधर्माविरुद्ध लढण्यासाठी विष्णू देवाचा अवतार आहे मी
वासुदेव देवकीच्या पोटी जन्मलेला
पुत्र आहे मी
माझा मामा दुष्ट कंसाचा वध करण्यासाठी. जन्माला आलो तो महावीर आहे मी
इंद्रपुत्र अर्जुनाचे महाभारताच्या लढाईत. सारथ्य करण्यासाठी जन्मलो
तो सारथी आहे मी
लहानपणी माती खाताना यशोदेला सापडलो. तोंड उघडल्यानंतर ब्रह्मांड दाखवणार. ब्रम्हांडनायक आहे मी
साऱ्या गोकुळवासियांच्या काळजाचा प्राण आहे मी...
