समजुन घे ना
समजुन घे ना
खरच मला समजून घे ना
अमावस्येच्या काळोख्या रात्रीत
मी चालत आहे
प्रकृतीच्या अंधकारात चालत आहे
कसा शोधू मार्ग
मला काही कळेना
खरंच तू मला समजून घे ना
माझ्या पाठीमागचे पुढे गेले
मी एकटाच मागे उरलो
आशात मी नैराश्यात गेलो
कसा शोधू मार्ग
मला काही कळेना
खरंच तू मला समजून घे ना
आज मी यशाला काबीज केलं असतं
पण तोंडावर येऊन ठेपलेल्या
संकटांना सामोरे जात असताना
मार्गच भटकलो
सांग ना ! कसा शोधून मार्ग
मला काही कळेना
खरंच तू मला समजून घे ना
आज असं वाटतं
ना कोणाशी काही बोलावं
ना कोणाच्यात रुळाव
ना हसावं
ना रडाव
ना काही करावं
नाही................
खरंच वाटतं
तू मला समजून घ्यावं
