STORYMIRROR

Aditya Gonugade

Fantasy

3  

Aditya Gonugade

Fantasy

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
176

   त्यावेळेच्या कडक उन्हाळ्यान आम्हांला भाजून काढला. आम्ही सगळीच मंडळी पावसाची वाट बघत बसलो होतो. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दोन दिवस नुसतं पावसाचं वातावरण तयार झालं होतं; पण पाऊस काय पडलाच नाही. वारही खूप होतं. आजतरी पाऊस पडतोय काय ? या आशेवर गावात सगळी माणसं बसली होती. 

    चारच्या सुमारास ढग दाटून आले. वार मारू लागले. अर्ध्या तासात वीजा चमकू लागल्या. सगळी माणसं घरात जाऊ लागली. सातच्या दरम्यान पाऊस पडयला सुरूवात झाली. तासा-दीड तासान पाऊस कमी होतोय, हे मी घराच्या खिडकीतून बरोबर हेरले, आणि मी घराबाहेर पडतोय न पडतोय तोपर्यंत माझे मित्रही घराबाहेर पडले.

   पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी जवळपास गल्लीतील सगळी माणसं पावसात भिजत होती. आम्ही पोरांनी खूप मज्जा केली. मी मज्जा करतच निसर्गाचे निरीक्षणही करत होतो. काय ती वारयामुळं हालणारी झाड, ओला चिंब झालेला रस्ता, काय ते पावळणीचं पडतेलं पाणी आणि खास करुन तो आकाशाचा मनमोहक रंग ! अहा ! काय तो सर्वांगसुंदर क्षण. माझ्या मनाला खूप भावला.

   पावसात भिजताना मी तर माझ्याच दुनियेत हरवून गेलो होतो. खरंच खूप मज्जा केली

थोड्या वेळान घरात आलो. अंग ओलचिंब झालं होतं. अंग पुसून आम्ही जेवायला बसलो. नंतर वही-पेन घेऊन मी त्या सोन्याहून पिवळ्या सुंदर क्षणाचे वर्णन करण्यात गुंतलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy