STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

शरदाचं चांदणं..

शरदाचं चांदणं..

1 min
165

कुणाचं तरी बोट पकडताना 

कुणाच तरी बोट निसटणारच.

दुःख उगाळणारी वेदनेची

सहाण वापरायचीच कशाला

त्याच्यापेक्षासुगंधित आठवणीची

उदबत्ती लावा ज्याच्यामुळे 

भवताल थोडा वेळ

तरी सुखावून निघेल.

परोपकार करायचाच 

असेल तर प्राजक्ताच्या

सड्या प्रमाणे दुसऱ्याच्या

अंगणात थोडा सुखाचा

सडा शिंपायला शिका.

कारण जेवढा द्वेष कराल

तेवढं कापरासारखे संपाल.

आसमंत उजळवूनच 

टाकायचा असेल तर

शरदाचं चांदणं व्हा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract