STORYMIRROR

Swati Desai

Inspirational

2  

Swati Desai

Inspirational

श्रावणसरी

श्रावणसरी

1 min
14.2K


चिंब चिंब भिजून

पांघरी हिरवा शेला

ओल्या मनाचा गारवा

झोंबतोय नभाला.

पानापानात खुलला

नव्या नवरीचा चेहरा

 हिरवा ऋतू बहरला

फुलला सुंगधी गजरा.

श्रावणात जीव वेडा

प्रेमसरीत भिजला

नटलेल्या वसुंधरेस

पाहण्या जीव आतुरला.

 ऊन पावसात चाले

पाठशिवणीचा खेळ

 झिम्मा फुगडीचा सखे

रंगला श्रावणात मेळ.

 

              

                  

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational