STORYMIRROR

Swati Desai

Romance

2  

Swati Desai

Romance

पाऊस

पाऊस

1 min
2.5K


पहिला पावसाची सरी

अन् गाली गुलाबाची लाली

सुगंधित तुझ्या प्रेमाच्या सरी

 चिंब काळजानं झाले ओली

प्रितीला फुटे पालवी

मिळे साथ पावसाची

रूणझुणत्या चिंब सरीत

ओढ तुला भेटण्याची.

चिंब झाल्या आठवणी

मनी दाटीवाटी मेघांची

ओघळल्या नभातुनी

सजली मैफिल शब्दांची.

आभाळाच्या ओसरीत

मृदु गोडवा प्रेमाचा

नटलेल्या वसुंधरेला

साज चढला प्रितीचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance