मैत्रीचा सातबारा
मैत्रीचा सातबारा
मैत्री लकीर हाताची
देते मनगटास जोड
हातात हात गुंफूनी
करी संकटांचा तोड
मैत्री नात्यांचा उतारा
भर उन्हाचा फवारा
सुखद छायेतील विसावा
असे जिव्हाळाचा उबारा
मैत्रीत रंगल्या मैफिली
चादर आहे स्मृतींची
मैत्री नाही हार-जीत
शर्यत सश्या-कासवांची
मैत्री जिवनाचा किनारा
अभेद्य अतुट सहारा
को-या कागदावर हि
आहे सातबारा उतारा
