Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dnyanoba Tidke

Tragedy

3  

Dnyanoba Tidke

Tragedy

श्रावणभास

श्रावणभास

1 min
454



दिसतचं नाही आजकाल ताे श्रावणमास

जाे आपण कधीकाळी पाहिला हाेता

नखशिखांत भिजणारा

काेवळे ऊन पांघरणारा

हिरवागार!


काेसळत आहेत आजकाल

सरीमागुन सरी

श्रावणसरी-

सुकत चाललेल्या पिकाकडं

भेगाळलेल्या रानाकडं

काेरड्या ढगांकडं 

केविलवाणं बघणाऱ्या

शेतकऱ्याच्या ढगासारख्या काळ्याठिक्कर डाेळ्यांतुन


काेसळत आहेत 

सरीमागुन सरी-

पंचमी आली असताना

जवळ एकही दमडी नसताना

लेकिची वाट बघणाऱ्या

चिंताग्रस्त आईच्या डाेळ्यांतुन


हाे!काेसळत आहेत 

सरीमागुन सरी-

लहानिर्दयीयी सुर्यानं जाळलेल्या

गवतास चाटणाऱ्या

तृषाक्रांत वाटणाऱ्या

व्याकुळ गुरांच्या डाेळ्यांतुन


अन् हाे! त्यातचं पडत आहे 

एकदम मस्त

राजकीय काेवळ ऊन सर्वञ

हाेलपट आश्वासनं देणार

आशायुक्त कुरणं जाळणार


तरीही भावुक भक्त जात आहेत मंदिरात

त्या भाेळ्या शंकराला

दुधाचा अभिषेक करायला

भक्तिभावानं

हंडेच्या हंडे दुध घेऊन 


अगदीतेव्हाच,

इकडं कित्येक घरात आक्राेशत आहेत

कित्येत इवले-इवले श्रावणबाळ,

शेत पिकणार नाही या चिंतेनं

आटलेलं आईच स्तन चघळत,

तिथंही काेसळतं आहेत 

सरी मागुन सरी

अविरत श्रावणसरी!

अर्थात अविरत अश्रुसरी!!


अन् आम्हां 

उगाचं भास

हा श्रावणमास!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy