STORYMIRROR

Dnyanoba Tidke

Others

3  

Dnyanoba Tidke

Others

जन्माची मरमर

जन्माची मरमर

1 min
348

उंचच उंच खुपच उंच

जीवन झुलतय झाेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबीखाेक्यावर!


दु:खांनी दु:खांवर बांधली माडी,

सुखाशी अलिप्त जीवन गाडी,

सगे-साेयरे मज साेडुन गेले

आवश्यकतेच्या माेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


कुणीच कुणाचे नाही जगी,

आपले-तुपले बाेलतात उगी,

दुर्भाग्य सदा घालते आहे

थैमान माझ्या डाेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


जे मी केले चाेरी गेले,

दिवसा-ढवळ्या पळवुन नेेले,

दिसत आहेत फक्त नि फक्त

धाेकेच धाेके धाेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


निरुपाय उरला जगण्याचा,

भराेसाच नाही तगण्याचा,

मग विश्वास कसा ठेवु सांगा

ह्रदयाच्या बेईमान ठाेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


उंचच उंच खुपच उंच

जीवन झुलतंय झाेक्यावर,

जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


जन्माची मरमर काेरली माझ्या

रिकाम्या नशीबी खाेक्यावर!


Rate this content
Log in