STORYMIRROR

Dnyanoba Tidke

Tragedy

3  

Dnyanoba Tidke

Tragedy

"बाप"

"बाप"

1 min
458

बाप ज्याला म्हणतात,

जाे असताे कणा घराचा,

नाही देऊ शकला साथ आमची,

गेला साेडुन अवचित आम्हां

परदेसी लेबल 

आमच्या माथ्यावर चिकटवुन,

पाेरकं करुन आम्हाला,

दुख्ख याचं नाही मुळीचं मला,

मरणप्राय यातना भाेगणार्या

मायकडं बघुन, 

नाही राेकु शकत मी माझ्या आसवांना

का साेडुन गेला बाप

असं तिला एकांती,

जीवनभर यातनेच्या अग्नित जळण्यांस्तव,

काय अधिकार हाेता त्याला

साता जन्माची शपथ घेतल्यास

अशी मनमानी करण्याचा,

बघत असेल का ताे

आमची दयना काेठुन तरी,

एखादा तारा बनुन आकाशातुन,

का येत असेल 

एखादा पक्षी बनुन

दरराेज दारात ,

हुडकतंय माझं आसुसलेलं मन

प्रत्येक जीवात बापाला,

पाहताे दुसर्यांचे बाप जेव्हा-केव्हा

वाटतं 

असा असता की 

तसा असता बाप माझा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy