"बैलपाेळा"
"बैलपाेळा"
मालक,
आज बैलपाेळा म्हणुन
तुम्ही मला रंगवलं
तुम्ही मला सजवलं
तुम्ही मला गाजावाजा करत गावात मिरवलं
हा झाला माझ्याविषयीचा कृतज्ञतेचा भाग
माझ्या अविरत कष्टाची परतफेड
पण मालक आमच्या नष्ट हाेत चाललेल्या
प्रजातीचं काय
आहे का आमची गाेठ्यात हंबरती माय
तेहतीसकाेटी देवांची आश्रयदायी गाय
तुम्ही मला पुरणपाेळी चारली
मी ती नाही खाल्ली
म्हणुन तुम्ही दुख्खी झालात
पण माझ्या दुख्खाची जाणीव तुम्हाला आहे काय?
आज गावात मिरवताना मला आठवला<
/p>
ताे पंधरा वर्षांपुर्वीचा काळ
गावात दिसायची ह्या कडेहुन त्या कडेपर्यंत
बैलांची माळ
आहेत का कुठं त्या चार बैली सहा बैली
नांगर आेढणाऱ्या जाेड्या
त्या आधुनिकतेच्या नावाखाली
राहिल्या आता थाेड्या
नाममाञ राहिली बैलं माझी भाऊ
हे रडगाणं मी कुणापाशी गाऊ
कारण खाटकाच्या दावणीला आहे माझी माय
सांगा मालक आमचा गुन्हा तरी काय
'मी पुरणपाेळी खाताे मालक!'
पण......
आमच्यासाठी तुम्ही, काही कराल काय?
आमच्यासाठी तुम्ही, काही कराल काय?