पाेरा!नकाे मनात झुरु!
पाेरा!नकाे मनात झुरु!
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु,
झाले गेले विसरुन जा
नकाे चिंता करु!
केले अपार कष्ट तु
तरी नाही लाभले फळ,
मारली डुबकी दैवसागरी
दिसलाच नाही तळ,
जा तु शेतात जाेमानं
कर कामाला सुरु,
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
घे चार म्हशी
बांध आधुनिक गाेठा,
विकुन शहरी दुध
हाेशिल तुही माेठा,
सार मागे हाताच्या बाहया
नकाे लाज धरु,
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
टाक किराणा दुकान
धंदा आहे खास,
हाेशील मालक मनाचा
ठेवशील अनेक दास,
चालवं डाेकं सावकारी
नकाे मुर्ख ठरु,
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
उभार हाैटेल चहा पाण्याचे
उचल कप-बशी,
वाढव धंदा हळुहळु
हाेतील साेन्याच्या राशी,
अशक्य काही नाही जगी
नकाे मनाने हारु,
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
नाैकरी न मिळाल्याची
पुरे जाहली खंत,
मनात भिरभिरत्या दु:ख्खांचा
करुन टाक अंत,
अनेक मार्ग माेकळे यशाचे
नकाे डाेळे भरु,
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
नाही भेटली नाैकरी
पाेरा!नकाे मनात झुरु!
झाले गेले विसरुन जा
नकाे चिंता करु!