STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

4  

Deepali Mathane

Tragedy

शोषण

शोषण

1 min
209

गरीब-श्रीमंत भेदाभेद

माणुसकीला नसे थारा

शोषणाच्या रोगाचा तुम्ही

थोडातरी उपचार करा

   जातीयतेच्या काळोखास

   प्रकाशमान करूनी विसरा

   दीन-दुबळ्यांना समाजात

   लाभू द्या मानाचा आसरा

स्त्री शोषणाची कीड

गिळंकृत समाज सारा

घरी-दारी शोषणाचा

ठेवला कडा पहारा

    शरीराचा ठाव घेती

    वखवखलेल्या नजरा

    मंदिरात देवीला वाहती

    भक्ती-भावाने गजरा

कोवळ्या कळ्यांनाही

निरागसता ठरली शाप खरा

बालमजूरांचे शोषणातुनी

जीवन तुम्ही मुक्त करा

      शिक्षणाचा एक हात द्या

     उजळूनी त्यांच्या संसारा

      धगधगत्या जीवनातील

     चमकू द्या पेटता निखारा

थांबवा शोषणाचा हा

काळाबाजार सारा

पात्रता गुणांनी त्याच्या

जीवास मिळू द्या थारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy