शोक कविता
शोक कविता
'ती' गेली म्हणून शोक केला...
पण 'ती' रोज मरते... त्याचं काय?
'तिचं' मरणं दु:खद खरं...
पण, मरणाचीच बातमी होते... त्याचं काय?
'ती' लढते रोज जगण्यासाठी...
दखल घेत नाही कोणी.... त्याचं काय?
'ती' आहे, म्हणून 'जन्म' आहे...
हे लक्षातच राहत नाही... त्याचं काय..?
