Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy

3  

Chandan Pawar

Tragedy

शिवस्मारक

शिवस्मारक

1 min
465


शिवस्मारकाच्या वाट्याला हे

कसले भोग येऊ लागले ;

"जाणता राजा " च्या स्मारकावरून

महाराष्ट्रात राजकारण होऊ लागले.


"शिवस्मारक विरुद्ध सरकार"

वादावर वाद बोकाळू लागले ;

खोट्या अस्मितेचे मद्य पिऊन

माकडे जोरात चेकाळू लागले.


शिवस्रमाकाच्या पायाभरणीला

अपशकुनी गाल'बोट' आहे ;

श्रेद्धेच्या राजकारणात सिद्देश

पवारचा अपघाती घोट आहे.


धगधगत्या शिवइतिहासाचे अभेद्य

गडकोटच खरे प्रेरक आहेत ;

शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन

हेच शिवरायांचे स्मारक आहे.


अरबी समुद्रातील शिवस्मारकात

राजकीय पाणी मुरत आहे ;

शिवस्मारकाच्या "मनोहर" रूपाचे

स्वप्न मृगजळ ठरत आहे.


शिवस्मारकाचा कागदी घोडा

केवळ कागदावर फुरफुरत आहे ;

शिवस्मारकाची धूळ माथी लावण्यासाठी

सागराचा प्राण तळमळत आहे.


शिवस्मारकासारखी आपल्या

वैचारिक उंचीतही वृद्धी व्हावी ;

चिरंजीव शिवविचारांच्या आचरणाने

तना-मनाची शुद्धी व्हावी.


Rate this content
Log in