अंधारमय जगणं
अंधारमय जगणं
झोपडीत एका
संसार चाले।
आयुष्यच सारे
लक्त्तर झाले।
फकीर मी काय
नशीबात आले।
पैशाशिवाय
कुठे काय चाले।
कष्ट करूनही
भरेना हे पोट।
सांगा भविष्य
आहे कुठे खोट।
शिक्षण पाणी
मुलं अडाणी।
डॉक्टर विनाच
चाले दवापाणी।
गरिबाच्या घरची
हीच कहाणी।
अंधारमय जगणं
मरण क्षणो क्षणी।
