STORYMIRROR

bhagyshri Sangale

Tragedy Others

3  

bhagyshri Sangale

Tragedy Others

छोटेसे गाव माझे

छोटेसे गाव माझे

1 min
322

छोटेसे गाव माझे मला खूप भावते 

इथेे मन माझे हरूनिया जाते


विस्तीर्ण आहे जागा पणं घरं आहेत कमी

आहेेत स्वच्छ मनाची माणसे येतात जे कामी


डॅम आहे वैभव गावाचे

जो आहे शेतीच्या कामांचे


जंगलााची देणगी लाभली आहे गावा 

पटदान आहे एक माझ्या गावच्या नावा


गावात आहे काही सुुंदर पहाडी

आहेेत काही घरे आहेत काही झाप (झोपडी)


फिरूनिया जग सारे माझ्या गाववानी नाही

सूर्याची किरण मला खिडकीतून पाही


सुंंदर गुरे रानी, चरावयास जाती

 गळ्यातील घंटी नाद, मनास मोहती


छोटस मंदिर मारुतीच नाही धाम 

पणं भावे मनाला जैसा राधेला भावे श्याम


आवडे मला गाव माझे निसर्ग गंगा जेथे वाहे

शहराची आस नाही मला प्रदूषणाचा जिथे वाडा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy