अडाणी आई
अडाणी आई
अडाणी आई आहे हेच बर आहे..
साधं सर्दी खोकला झाला की
आलं तुळस काढा द्यायची
पोट दुखलं की ओवा चावायला द्यायची
ताप आला की डोक्यावर
पाण्याची पट्टी ठेवायची
ना टेस्ट ना स्पेेशालिस्टचं झंझट
निरोगी आयुुुष्य जगत होतो ....
आई अडाणी आहे हेच बरं आहे की....
रामरामला रामराम
सलामवालेकुमला वालेकुम अस्सलाम
जय भीमला जय भीम असे प्रेमानेे बोल शिकवलं
ना धर्म सांगितला ना जात बोलली आईने
माणूस म्हणून जगता यावे असं शिकवलं
आई अडाणी आहे हेच बरं आहे...
सकाळी न्याहारीला दूध भाकरी दुपारी जेवणात
कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणात
कोरड्या भाकरी पोटभर खात होते
ना हेल्दी ब्रेकफास्ट मेनू
ना लंचचं चोचलेपणा आणि डिनरचं
सोफीस्टिकेेटेड उपासमारीपेक्षा
दिवसभर भरपेट चरत होतेे.
आई अडाणी आहे हेच बरं आहे
आई अडाणी असतानादेखील सुशील
ताना मागे टाकणारी आहे आयुष्य कसे
जगावे हे तिच्याकडून शिकावे
जेव्हा मी सुशिक्षित झालो
भपकेबाजीत घुसू लागलो
ढोंगी जग बघू लागलो
आणि मग परत वाटू लागलंं की
आईसारखं आपणही अडाणी असतो
तर बरं झालं असतं...
