डोळे
डोळे
तिच्या डोळ्यांना जादूगारच म्हणावे
ज्याच्यात बघताच भान हरपले
डोळ्यांतून हृदयात आली ती माझ्या
आणि मन माझे तिचे झाले
झरझरणाऱ्या अश्रूचे
तिला बघताच हिम गोठले
तिचे को किळ स्वर पडताच कानी
मन माझे तिचे झाले
आता मल फक्त
तिच्यातच गुंंतून राहू दे
मी तीच्या डोळ्यात मला
अन् ती माझ्या हृदयात तिला पाहू दे
प्रीतीचे हे राग अनोखे
दोघांना आयुुुष्यभर गाऊ दे
ती शोधत बसेल देवा तुला
पण तिच्यात मला देेव पाहू दे...
