Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

मन सोबतीला तुला

मन सोबतीला तुला

1 min
248


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


क्षण एक पुरे होतं जगायला 

पापणीतली साक्ष जापायला 

तुझ्या मनातील गूज बोलायला 

सांज नित्य येते ती छळायला


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते


क्षितिजाच्या पलीकडे जायला 

 असशील तुच माझ्या साथीला 

भाव अबोल ते मज सांगायला 

येशील तू पुन्हा मज भेटायला 


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


सागर किनारी अल्वार लहरी 

क्षितिजास या कवेत घ्यायला 

पुन्हा विरहाचे क्षण वेचयला 

मृगजळा परी जगणं द्यायला 


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


मनी आस देवूनी यतानेला

कष्टी अंतरीचे पुन्हा बहरतील

परतुनी येता संध्याकाळ ती 

सल मनीची ओंजळीत मावेल..


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


अशीच जराजराशी पुन्हा जगेल 

क्षणिक सुख नयनात साठवेल 

वळणावर क्षितिजास पाहूनी 

वाट जीवनी या वळणं घेईल 


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


असच होते संध्याकाळ माझी 

तुझ्या आठवणीत गंधाळेलेली 

अशीच होते सकाळ ही माझी 

तुझ्या विरहात मी सामवलेली 


मन सोबतीला तुला आठवते

तुझ्या वचनात स्वत:ला पाहते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance