STORYMIRROR

Uday Kulkarni

Tragedy

3  

Uday Kulkarni

Tragedy

भाकरीवरचं प्रेम

भाकरीवरचं प्रेम

1 min
261

भाकरीवर प्रेम करणारा 

कधीच कुठं हरत नाही

स्वतःवर विश्वास असणारा

कधीच उपाशी मरत नाही


प्रेम बीम थेर करणं

जमत सगळं त्यालाही

या कोणत्याच भानगडीत

तो कधीच पडत नाही


पिझ्झा बर्गर खाण्याची 

अपेक्षा तो करत नाही

दोन वेळच्या भाकरीसाठी

तो काही मरत नाही


अपेक्षांच्या ओझ्याखाली 

गाढला कधीच जात नाही

अवास्तव अपूर्ण स्वप्नांना

पाठीवर लादून फिरत नाही 


खळगी पडल्या पोटासाठी

इमान कधीच विकत नाही

भाकरीवर प्रेम करणारा

कधी कुठंच हरत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy