STORYMIRROR

Uday Kulkarni

Tragedy

4  

Uday Kulkarni

Tragedy

रुपया

रुपया

1 min
187

सगळं आयुष्य व्यर्थ

धन गोळा करण्यासाठी

कवडी दमडी जमवून

तिजोऱ्या भरण्यासाठी


सगळेच आहेत व्यस्त

वेळ नाही जगण्यासाठी

कोणीच नाही शांत

एक सुद्धा घटक्यासाठी


हा सारा उपद्व्याप 

नेमका असतो कशासाठी

एवढ्याशा आयुष्यात

एवढा प्रताप कोणासाठी


हे सारे करत असता

आयुष्य सरून जाते

अनंताच्या प्रवासची

वेळ येऊन ठेपते


मरणावेळी रुपया 

कपाळी बसून हसतो

त्याच ही बरोबर आहे

तो तरी कुठं आपला असतो?


नश्वर हा देह जातो

सरणावर जळून

लाख मोलाची शिकवण

जातो रुपयाही देऊन



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Tragedy