STORYMIRROR

Uday Kulkarni

Inspirational

4  

Uday Kulkarni

Inspirational

स्वप्न त्यांचे

स्वप्न त्यांचे

1 min
708

सावडून माझ्या स्वप्नांना

ओंजळीत घ्यावे म्हणतो

मुक्त होऊन आकाशात

उंच उडून जावे म्हणतो


खांद्यावरची झोळी माझ्या

रितीच ठेवावी म्हणतो

वेचलेल्या या फुलांमध्ये

अत्तर शोधून घ्यावे म्हणतो


अंथरलेला गालिचा ही

नेहमीच कुठे सलतो

रक्तबंबाळ करून हा 

मनात त्याचा हसतो


या वसुंधरेच्या शृंगारा

अशी माळ गुंफूनी घेतो

'त्या' ओंजळीतल्या स्वप्नांना 

माझ्या मुठीत दाबून नेतो


उचलुनी झोळी आता

क्षितीजाच्या पार जातो

त्या सुर्यालाही मग थोडे

हे स्वप्न दाखवून येतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational