STORYMIRROR

Uday Kulkarni

Tragedy Inspirational

3  

Uday Kulkarni

Tragedy Inspirational

शोधा जिवंत आहे

शोधा जिवंत आहे

1 min
219

देणे तुझेच होते

येणे तुझेच होते

सारे तुझ्याचसाठी

चालू नि बंद आहे


वाहून त्या पखाली

केल्या तुझ्या हवाली

मातीतल्या फुलांना

ओला सुगंध आहे


जगलो इथेच होतो

झुरलो इथेच होतो

आशेत मी कुणाच्या

बांधून हात आहे..


शब्दात नांदलो मी

ओठात नाचलो मी

गाण्यातही कुणाच्या

संगीत होत आहे...


विझलो तिथेच होतो

जळलो तिथेच होतो

राखेत लक्तरांच्या 

शोधा जिवंत आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy