विरह
विरह
एक होती चिऊताई
नाव तिचे सरूबाई
गोड स्मृती ठेवून जाई
विसर आणखी पडला नाही ।।
ती माझी चिऊ
मी तिचा भाऊ
भावंडे आम्ही खेळत राहू
मुली म्हणायच्या सरूचा भाऊ ।।
गावाला गेलेली ती ताई
परत कधीच आली नाही
अजान बालक विचारात राही
अक्का कधी येणार माई ।।
मायीच्या डोळ्यात पाणी येई
आठवणीने ती व्याकुळ होई
म्हणे बाळा तुला कळत नाही
देवाघरी गेलेला येत नाही ।।
