वांझ
वांझ
1 min
176
वांझ म्हणुनी हिनवू नका
तुम्ही सासूबाई
कौशल्येला सुद्धा राम लवकर झाला नाही
पुराणातुन काही तुम्ही शिकणार का नाही
कृष्णही देवकीला लवकर झाला नाही
मुलासाठी तुमची बघा भलतीच घाई
कुणाचा वंश चालवता पत्ताच नाही
वैद्य तर तुमच्या मुलातच दोष पाही
पाऊस चांगला झाल्या शिवाय जमीन पिकत नाही
हे तुम्हाला कस बाई कळतच नाही
वांझ म्हणुनी हिनवू नका
तुम्ही सासूबाई
कूस माझी रिकामी राहणार नाही
पहाट झाल्यावर सांगा उजडणार का नाही
"शिवाजी" आपल्या घरी जन्मणार सासूबाई
दुर्योधनाची माता मी होणार नाही
शेवटी होईल मी सपकाळाची सिंधूताई
वांझ म्हणुनी हिनवू नका
तुम्ही सासूबाई
