आंधळा
आंधळा
1 min
276
माझ्यासाठी हिंदू काय अन् मुसलमान काय ।
बापू मी तर आंधळा हाय ।।
चापळून पाहतो तर सर्वांनाच दोन हात दोन पाय ।
कपाळावरची जात जाणवत बी न्हाय ।।
माझ्यासाठी हिरवा, भगवा अन् पिवळा काय ।
रंगाची तर मला ओळखच न्हाय ।।
माझ्यासाठी सूर्योदय काय अन् चंद्रोदय काय ।
सदैव समोर माझ्या काळाकुट्ट अंधार हाय ।।
माझ्यासाठी व्हाट्सअँप काय अन् फेसबुक काय ।
बापू मी तर आंधळा हाय ।।
सत्ता संपत्तीच्या फंदात पडत न्हाय ।
माणुसकीला मी जागूण हाय ।।
डोळस माणसे तुम्ही करता काय काय ।
ऐकून जीव माझा गुदमरत हाय ।।
देवाचं माझ्यावर लई उपकार हाय ।
बरे झाले देवा मी आंधळा हाय ।।
